अहमदनगर । नगर सहयाद्री
कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून जाऊ नये. भावनाविवश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. येथील भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांनी मी येथून विधानसभा लढवावी अशी मागणी केली आहे त्याचे मी आभार मानते; परंतु यावर माझे कोणतेही मत नाही असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज संभाजीनगरहून आष्टीकडे जात असतांना नगरमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यावेेळी त्या बोलत होत्या.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक दहीफळे, युवा नेते नितीन शेलार, कैलास गर्जे, बंटी ढापसे, सरपंच अमित आव्हाड, सार्थक आंधळे, सरपंच बापू आव्हाड, वैभव झोटिंग अतुल गिते, सतीश ढाकणे, संकेत डोळे, सतीश घोडके, किशोर बडे, सौरभ सानप, विजय भालेकर, ज्ञानेश्वर आव्हाड, सुजल आंधळे, रविराज आव्हाड, युवराज शिरसाठ आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभेच्या निवडणुकानंतर पंकजा मुंडे या प्रथमच नगरला आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी आपला पराभव जरी झाला तरी तुम्हीच आमचे नेतृत्व, तुम्हीच आमचे सरकार असे म्हटले. आपल्या भविष्यातील पदाकडे आमचे लक्ष लागले आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.