spot_img
अहमदनगरWater Issue: 'पाण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा व्याकुळ'

Water Issue: ‘पाण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा व्याकुळ’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईचा फटका ऊस पिकालाही मोठ्या प्रमाणात बसत असून ऊसाला पुरेसे पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ होत आहे. श्रीगोंदा तालुक्याला गेल्या अनेक वर्षांपासून कुकडीचे तीन ते चार आवर्तने सुटायची त्यानुसार शेतकर्‍यांनी शेतात ऊस पिकाची लागवड केलेली दिसून येत आहे. परंतु पाण्याअभावी उसाची पिके जळू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

येते पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही तर वाढीच्या अवस्थेतील ऊसाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आम्हीआहे. तालुक्यातील ऊस हंगाम पूर्णपणे संपला आहे अनेक शेतकर्‍यांनी उपलब्ध पाण्याचे भरवशावर ऊस लागवडी केलेल्या आहेत. पण कोवळ्या ऊस रोपांना पाणी देताना शेतकर्‍यांची मोठी दमछाक होत आहे. असे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

लागवडीसाठी,मशागतीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कुकडीचे पाणी वेळेत न मिळाल्याने . तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे ऊस करपून गेले आहेत. मोठ्या कष्टाने लागवड केलेल्या उसासाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे. पण पाणी नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या ऊस जळून जात असल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसत आहे.

पाणी विकत घेण्याची वेळ
कशी करावी शेती, खत महाग, खर्च जास्त, पाण्याचा तुटवडा यंदा पहिल्यांदाच उसाला पाणी देणे आमच्या आवाक्या बाहेर जात आहे. कोणत्याही परिस्थितीत पाणी देणे गरजेचे असल्याने दुसरीकडून विनवण्या करून विकत पाणी घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे. आम्ही कुकडी च्या पाण्याची व पावसाची वाट पाहत आहे. असे घुगलवडगाव चे शेतकरी बाळू चव्हाण, चंद्रसेन बोराटे, परसराम ननवरे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

पाऊस झाल्याशिवाय लागवडीचे धाडस करू नये
सध्या ऊस पट्ट्यात पाण्याची स्थिती बिकट आहे जरी एखाद्याकडे पुरेसे पाणी असेल तरी मर्यादित वीज पुरवठ्यामुळे पुरेसे पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. सध्या नव्या लागवडी शेतकर्‍यांनी शक्यतो टाळाव्यात तप्त जमीन व अपुरे पाणी यामुळे सध्या तरी तातडीने नव्या लागवडी करू नये. साधारण ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय उसाच्या लागवडीचे व पेरणीचे धाडस करू नये.
– दीपक सुपेकर (तालुका कृषी अधिकारी )

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...