अहमदनगर। नगर सहयाद्री
एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे बिबट्याने दोन वर्षाच्या बालिकेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. वेदिका श्रीकांत ढगे असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. पोटचा गोळा गेल्याने कटूंबावर मोठे दुःख कोसळले आहे.
अधिक माहिती अशी की, गुरुवार (दि. २३) रोजी सकाळी आठच्या सुमारास वेदिका श्रीकांत ढगे ही दोन वर्षीय बालिका अंगणात खेळत होती. जवळच असलेल्या गिन्नी गवतात बिबट्या लपून बसलेला होता. यावेळी बिबट्याने अचानक बालिकेवर हल्ला केल्याने घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला.
त्यामुळे बिबट्याने बालिकेला सोडून पलायन केले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीरित्या जखमी झाल्याने कुटुंबियांनी व आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पंरतु, त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तळहता प्रमाणे जपलेला पोटचा गोळा गेल्याने आईने हंबरडा फोडला तर कटूंबावर मोठे दुःख कोसळले आहे.