spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: चेन स्नॅचिंग करणार्‍या टोळीच्या मुस्क्या आवळल्या,'असा' लावला सापळा

Ahmednagar Crime: चेन स्नॅचिंग करणार्‍या टोळीच्या मुस्क्या आवळल्या,’असा’ लावला सापळा

spot_img

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी | चौदा गुन्ह्यांची उकल
अहमदनगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणार्‍या टोळीच्या मुसया आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सहा जणांच्या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून २१४ ग्रॅम दागिन्यांसह १७.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, तपासात आरोपींकडून जिल्ह्यातील १४ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

रुपाली सुधीर कदम (वय ३२, रा. दत्तनगर, श्रीरामपूर) या बाभळेश्वर रोडने जात असतांना २ अनोळखी आरोपींनी मोटारसायकलवर वेगात येऊन त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण बळजबरीने हिसकावून नेले होते. या गुन्ह्यासह जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. पथकाने संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगांव, शेवगांव या ठिकाणी झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदारामार्फत संशयित आरोपींची माहिती घेतली. सदर गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी विनोद ऊर्फ खंग्या, विजय उर्फ छैल्या चव्हाण (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) याने साथीदारांसह केला असल्याची व तो साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करीता श्रीरामपूर – नेवासा रोडवरील अशोकनगर फाटा येथे येणार असल्याची माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली.

पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ते पळून जाण्याच्या तयारीत असताना पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण (वय २६, रा. मोहटादेवी मंदीरामागे, अशोकनगर, ता. श्रीरामपूर), सुनिल शानिल पिंपळे (वय ३७, रा. वसु सायगांव, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी साथीदार विशाल सुनिल पिंपळे (वय २२, रा. वसु सायगांव, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर, राजेश राजु सौलंकी (रा. सुहागपुर, जि. हौशीगाबाद, मध्यप्रदेश, फरार), ऋषिकेश कैलास जाधव (रा. श्रीरामपूर, फरार), रंगनाथ उर्फ रंग्या युवराज काळे (फरार) यांच्यासह गुन्हे केल्याचे सांगितले.

यातील विशाल सुनिल पिंपळे याला ताब्यात घेण्यात आले आहे.मिळुन आला आहे.आरोपींच्या तपासात कोपरगाव शहर, संगमनेर शहर, शिर्डी, श्रीरामपूर शहर व शेवगाव येथील १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण विरोधात श्रीरामपूर शहर, तोफखाना, सिडको एमआयडीसी, हरसूल व पुंडलिक नगर, छावणी, सिटी चौक (छत्रपती संभाजीनगर), लोणी, राहुरी, शिर्डी, संगमनेर शहर, कोपरगाव शहर, परतूर (जालना), जवाहरनगर, देवळाली कॅम्प (नाशिक), पनवेल (नवीमुंबई) अशा विविध पोलिस ठाण्यात ४३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...