spot_img
अहमदनगरधक्कादायक! इव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा वावर; लंके यांच्या आरोपावर प्रशासनाचा खुलासा...

धक्कादायक! इव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा वावर; लंके यांच्या आरोपावर प्रशासनाचा खुलासा…

spot_img

नीलेश लंके यांनी व्हिडिओ ट्वीट केल्याने खळबळ
अहमदनगर | नगर सह्याद्री
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मतदान चौथ्या टप्प्यात पार पडले. मतदान पेट्या एमआयडीसी येथे वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवल्या आहेत. इव्हीएम ठेवलेल्या स्टाँग रुमला त्रीस्तरीय सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे. परंतु, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नीलेश लंके यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्तीचा वावर सुरु असल्याचा त्यांनी दावा केला आहे. कुंपणच आता शेत खातंय असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
निलेश लंके यांनी यांसदर्भात व्हिडिओ ट्वीट करत म्हटलंय की, संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला.

माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतंय, असं निलेश लंके म्हणाले आहेत.निलेश लंके यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे राजकारण तापण्याची शयता आहे. लंके यांनी यापूर्वीची काही आरोप केलेले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केला खुलासा
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाबाबत मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आली असून त्याबाबत कोणतीही कमतरता राहिलेली नाही. या ठिकाणी नेमण्यात आलेली त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा नियमानुसार कार्यरत असून सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

३७ – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या एक्‍स या सोशल मिडिया अकाऊन्टवरून प्रसारित झालेल्या सुरक्षा कक्षाच्या सीसीटीव्ही व्हिडीओबाबत वस्तुस्थिती मांडताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी माहिती दिली की, एक्स या सोशल मिडिया अकाऊन्टवर प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही निवडणूक प्रशासनाकडून विहित नियमानुसार नेमण्यात आलेली सीसीटीव्ही पुरवठादार आहे. या पुरवठादाराशी झालेल्या करारनाम्यानुसार सीसीटीव्ही व आनुषंगिक उपकरणे वेळोवेळी तपासून त्या सुस्थितीत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी पुरवठादाराची आहे. लोकसभा मतदारसंघांच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षाकक्षाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही तसेच सुरक्षा व्यवस्थेची दैनंदिन देखरेख करण्याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांच्या दि. ६ मे २०२४ व १७ मे २०२४ च्या आदेशानुसार जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

या आदेशानुसार दि. २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत राहुल शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांची नेमणूक करण्यात आली होती. दि. २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ७:५४ वाजता श्री. शेळके यांना ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी हॉलच्या एका कॅमेऱ्याचे लूज कनेक्शन असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार त्यांनी सायंकाळी ८:१५ वाजता सदर पुरवठादार अजिनाथ शिवाजी मुळे, स्वामी एन्टरप्रायझेस यांना सीसीटीव्ही व आनुषंगिक उपकरणांची तपासणी करण्याकरिता कळविले होते. त्यानुसार सदर पुरवठादार यांनी तिथे उपस्थित असलेल्या सीआरपीएफ सुरक्षारक्षकांना याबाबत पूर्वकल्पना दिली होती. तसेच सीआरपीएफ सुरक्षारक्षकांच्या नोंदवहीमध्ये प्रवेश करण्याबाबत सायंकाळी ८:२० वाजता नोंद केली होती. तद्नंतर दोन सीआरपीएफ सुरक्षारक्षकांसोबत वरील सीसीटीव्ही पुरवठादार यांनी मतमोजणी हॉलच्या कॅमेऱ्याची तपासणी केली होती. त्यानंतर सायंकाळी ८:२५ वाजता तिथून निघताना पुन्हा सीआरपीएफ सुरक्षारक्षकांच्या नोंदवहीमध्ये नोंद केली होती.

३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे कोणतेही कॅमेरे नादुरुस्त नसून ते सुरळीतपणे काम करीत असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...