spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: ‘ध्येय’ मध्ये अडकल्या 'इतक्या' ठेवी? चेअरमनसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar Crime: ‘ध्येय’ मध्ये अडकल्या ‘इतक्या’ ठेवी? चेअरमनसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
येथील ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. एकुण ११२ ठेवीदारांचे पाच कोटी ७८ लाख ६५ हजार ९० रूपये अडकले आहे. त्यांना ठेवी परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.

याप्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (वय ४७ रा. शोभा कॉलनी, शिंदे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी ता. नगर), संचालक निलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव ता. नगर), पुजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघे, रा. बोरूडे मळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी सुजाता नेवसे यांनी १ डिसेंबर २०२२ रोजी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड, पाईपलाईन शाखेत दोन लाख रूपये मुदतठेव १४.४० टक्के व्याजदराने ठेवले. तसेच १९ ऑगस्ट २०२३ रोजी आणखी एक लाख ७५ हजार रूपये मुदतठेव ठेवली. दरम्यान फिर्यादी नेवसे या ३ डिसेंबर २०२३ रोजी पतसंस्थेच्या बालिकाश्रम शाखेत गेल्या व चेअरमन भागानगरे यांना भेटून दोन लाख रूपये मुदतठेवीची मागणी केली.

भागानगरे याने,सध्या आमच्याकडे पैसे नाहीत, लोनचे पैसे जमा झाले की तुम्हाला बोलून घेवू व रक्कम परत देऊ’ असे सांगितले. त्यानंतरही नेवसे यांनी वेळोवेळी पतसंस्थेत जावून पैशाची मागणी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्था बंद झाली असल्याचे नेवसे यांना १५ डिसेंबर २०२३ रोजी समजले.

त्यानंतर त्यांनी संस्थेचे मॅनेजर भूषण शिंदे यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले, चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळांनी एक ते दोन महिन्यापासून पतसंस्थेत येणे बंद केले असून माझा त्यांच्याशी संपर्क होत नाही. तुम्ही पोलिसात तक्रार करा’. त्यानंतर नेवसे यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असता त्यांना समजले की इतर १११ ठेवीदारांचे पैसे पतसंस्थेत अडकले आहे. नेवसे यांनी १६ मे २०२४ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, अन्यथा… आज कुणाच्या राशीत काय?

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन...

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...