spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics: कृषीमंत्री मुडेंनी गाजवली खा. विखे पाटलांची प्रचार सभा! विरोधकांचा सुद्धा...

Ahmadnagar Politics: कृषीमंत्री मुडेंनी गाजवली खा. विखे पाटलांची प्रचार सभा! विरोधकांचा सुद्धा घेतला समाचार, पहा एका क्लिकवर

spot_img

शेवगाव । नगर सहयाद्री
उभा देश म्हणतोय की देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. तसेच खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ते शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आमदार मोनिकाताई राजळे, चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, दत्ताभाऊ पानसरे, नंदू मुंडे, अरूण मुंडे, एकनाथ खटाळ, काकासाहेब ननावरे, राहुल देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सभेला मार्गदर्शन करताना मंत्री मुंडे म्हणाले की, मोदी साहेब देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आल्याचा आनंद होत आहे. २०१४ मध्ये देश दिवाळखोरीत निघाला असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत १० वर्षात इतके काम केले की, देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर आणुन ठेवली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात देशाची इतकी पत आणि प्रतिष्ठा वाढली आहे की, आपल्या देशाबद्दल जर इतर देशातील मंत्रीमडळातील एखाद्या नेत्याने ब्र जरी काढला तरी त्या देशाचा पंतप्रधान त्या नेत्याचा राजीनामा घेतो. आज ही ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. यामुळे जर देश सुरक्षित आणि विकसित ठेवायचा असेल तर मोदींशिवाय देशाला कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी त्यांनी विरोधकांचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, ७० वर्षात ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी केवळ लोकांची फसवणूक केली. तर पंतप्रधान मोदी यांनी ८० टक्के लोकांना मोफत राशन देवून त्यांची भूक भागवली आहे. विरोधी उमेदवारावर बोलताना मंत्री मुंडे म्हणाले की, जो पोलिसांचा बाप काढतो तो उद्या निवडून आल्यावर तुमचा बाप काढायला सुद्धा कमी करणार नाही. पारनेर तालुक्याने जी चुक केली ती चुक आता तुम्ही करू नका असे आवाहन त्यांनी केले.

मुंडे यांनी महायुती आणि मोदी सरकारच्या माध्यनातून शेतकरी, महिला, तरुणांना, औद्योगिक क्षेत्राला विविध माध्यमातून झालेल्या फायद्यांची माहिती देत डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली खा. विखेंच्या माध्यमातून नगर जिल्हा देशातील सर्वात विकसित १० जिल्हा म्हणून नावारुपाला येईल अशी खात्री देत येता १३ मे रोजी अनु, क्र. ३ समोरील कमळ चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...