spot_img
अहमदनगरबारामतीत आज घडलंय काय? हायव्होल्टेज राजकारण पहा एका क्लिकवर..

बारामतीत आज घडलंय काय? हायव्होल्टेज राजकारण पहा एका क्लिकवर..

spot_img

बारामती । नगर सहयाद्री 


शरद पवारांनी रांग लावून बजावला मतदानाचा हक्क
राज्याचं नव्हे तर लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघावर आहे. याच पार्श्वभूमीवर आज बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. शेकडो लोक घराबाहेर पडून मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. शरद पवार यांनी देखील आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास माळेगाव येथील मतदान केंद्रावर पोहोचले. त्यानंतर मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदानसाठी शरद पवार स्वतः रांगेत थांबले. यावेळी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज काटेवाडी मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मतदान केले. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. दरम्यान, राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात आजच मतदान होत आहे.

धामधुमीत सुप्रिया अजित पवारांच्या घरी!
बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडले. पवार कुटुंबातील उमेदवार आमने-सामने आल्यामुळे ही निवडणूक देशपातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातच ही लढत होत असताना ऐन मतदानाच्या धामधुमीत सुप्रिया सुळे चक्क अजित पवारांच्या घरी गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं घरी काय घडलं? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत.अजित पवार यांच्या घरी, अर्थात बारामतीतील विरोधी उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या घरी सुप्रिया सुळेंनी सकाळी मतदानानंतर भेट दिली आहे.

दत्ता भरणे यांच्या अडचणीत भर
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात आमदार दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दत्ता भरणे यांचा हा दमदाटीचा व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. दत्ता भरणे यांच्या दमदाटीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यानंतर बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दत्ता भरणे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे दत्ता भरणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

बारामती पोलिस बंदोबस्तात पैशाचा पाऊस
बारामती लोकसभा मतदारसंघात पोलिस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदार यांना पैसे वाटप सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.त्या बाबतचे व्हिडिओ देखील शेअर केले आहे. दरम्यान सदरचे पैसे वाटप करण्यासाठी भोर येथील अजितदादा मित्र मंडळाचा पदाधिकारी व मावळ तालुक्यातील कार्यकर्ते यांचा समावेश असल्याचा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...