नगर सह्याद्री वेब टीम-
अनेक शिक्षित तरुणांचा कल आज व्यवसायाकडे वळत आहे. आजकाल व्यवसायाच्या अनेक संधी व वेगवेगळे मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यातललाच एक मार्ग म्हणजे मत्स्यपाल हा एक आहे. यातून देखील खूप उत्पन्न मिळू शकते.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तयार केली आहे. यामध्ये जर मत्स्यव्यवसाय करायचा असेल तर त्याला चालना देण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आर्थिक मदत करत आहेत.
मत्स्यपालनासाठी 50% पर्यंत अनुदान
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत, राज्य सरकार शेतकरी आणि गरीब ग्रामीण पशुपालकांना मत्स्यपालनासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. याशिवाय त्यांना आर्थिक मदतीसोबत नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्याचेही सरकारचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून उत्पन्न दुप्पट करून नफा मिळवता येईल.
राज्यानुसार वेगेवेगळी धोरणे
प्रत्येक राज्यात त्या त्या सरकार नुसार याचा अवलंबकेला जातो. काही राज्ये याबाबतीत अत्यंत अग्रेसर आहेत. तर काही राज्य सरकार याबाबतीत अजून थोडे मागे आहेत. परंतु मत्स्य व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या मदतीने एक मोठा पर्याय मिळू शकतो. याद्वारे आपण आर्थिक प्रगती देखील याद्वारे साधू शकतो.