spot_img
अहमदनगरधक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

spot_img

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर बांधवांमध्ये संताप

पारनेर | नगर सह्याद्री
मेंढ्यांसह भटकंती करताना मजल- दरमजल करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या ढवळपुरी येथील एक मेंढपाळ हा कान्हूरपठार शिवारात ठुबे मळा येथे मेंढ्यांचा वाडा घेऊन आलेला असताना त्याची अल्पवयीन मुलगी त्याच मळ्यातील एका तरुणाने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली असता पोलिसांनी त्यास हुसकावून लावले. यासाठी पारनेर पोेलिसांवर तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी दबाव टाकल्याची चर्चा झडत आहे. त्यामुळेच फिर्यादीत अल्पवयीन मुलीचे वय आणि पुरावा असतानाही व आरोपीचे नाव असतानाही पोलिसांकडून पोस्कोचे कलम न लावता पळवून नेल्याचे कलम लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेने धनगर बांधवांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत असून याबाबत ढवळपुरी येथील एका मेंढपाळाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी मेंढीपालन करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवतो. माझे तीन मुलींचे लग्न झालेले असुन त्या त्यांचे सासरी नांदत आहे. अल्पवयीन मुलगी ही आमच्यासोबत मेंढया चारण्याचे काम करते. सध्या आमचा मेंढयाचा वाडा हा फेब्रुवारी २०२४ पासुन कान्हूरपठार येथील ठुबेमळा येथे असुन आम्ही तेथेच राहत आहे. दि-०४ मार्च २०२४ रोजी मुलगी कल्पना (वय- २० वर्ष) हिचे कान्हूरपठार येथे कृष्णा कामा क-हे (रा- जांभळी, ता- राहुरी, जि-अहमदनगर) यांचेसोबत झालेले आहे. सदर लग्नाची तयारी ही लग्नाअगोदर पंधरा विस दिवसापासुन सुरु होती.

मुलगी कल्पना हिचे लग्नाकरीता आवश्यक असणारे साहित्य आणणेकरीता मी व पत्नी सुमन असे कान्हूरपठार येथील वाडयावरुन टाकळी ढोकेश्वरकडे दुपारी निघालो होतो. त्यावेळी अल्पवयीन मुलगीला वाडयावर मेंढया सांभाळण्याकरीता थांबवले होते. आम्ही टाकळी ढोकेश्वर येथुन सामान घेवुन पुन्हा दुपारी कान्हूरपठार येथील वाडयावर आलो असता मुलगी आम्हांला दिसली नाही. त्यामुळे आम्ही आजुबाजूच्या रानामध्ये शोध घेतला परंतु सायंकाळ झाली तरीही मुलगी आम्हांला मिळुन आली नाही. त्यानंतर देखील आम्ही नातेवाईकांकडे तसेच गावामध्ये देखील मुलगी शोध घेतला पंरतु ती कोठेही मिळुन आली नाही. माझे मोठ्या मुलीचे लग्न असल्याने व मुलगी बेपत्ता झाल्याने तिचे लग्नामध्ये काहीतरी बाधा होईल म्हणुन इतर नातेवाईकांना सांगितले नव्हते.

मुलगी कल्पना हिचे लग्न झाल्यानंतर पुन्हा मुलीचा हिचा शोध घेत असताना ती कान्हूरपठार येथील ठुबेमळा येथे एका घरासमोर आम्हांला दिसली. त्यामुळे आम्ही तिचेकडे गेलो असता तेथे असलेल्या एका इसमाने त्याचे नाव हे संकेत नाना नवले असे सांगुन तो मुलीस आमचे समोरुन घरामध्ये घेवुन गेला. त्यानंतर पुन्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो असता मुलगी व संकेत नाना नवले हे मिळुन आलेले नाहीत. त्यामुळे आमची खात्री झाली की, संकेत नाना नवले याने मुलीस अज्ञात कारणाकरीता आमच्या कान्हूरपठार येथील वाडयावरुन पळवुन कोठेतरी नेलेले आहे.

धनगर बांधवांनी वाडा घेऊन पारनेरमध्ये थांबायचे की नाही?
संकेत नाना नवले याने त्या अल्पवयीन मुलीस वाड्यावर असताना फुस लावून तिच्या सोबत लग्न केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. दरम्यान, आमच्या मुली जर अशा प्रकारे मेंढ्या घेऊन वाडा चारताना पळवून नेल्या जात असतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल मुलीच्या वडिलांनी केला आहे. आम्ही वाडे घेऊन बाहेर जाताना मुलींना सोबत घ्यायचे की नाही आणि सोबत घेतले तर त्यांना अशा पद्धतीने फुस लावून पळवून नेले जात असेल तर आम्ही पारनेर तालुक्यात थांबायचे की नाही असा प्रश्न तयार होत असल्याचे मुलीच्या वडिलांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पारनेर पोलिस कोणाच्या दबावाखाली आहेत याचा शोध घ्यावा लागणार असल्याचा ढवळपुरी येथील धनगर बांधवांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...