spot_img
ब्रेकिंगWeather Update: ‘ राज्यात 'अवकाळी' पावसाचे थैमान! हवामान विभागाचा पुन्हा इशारा, 'या'...

Weather Update: ‘ राज्यात ‘अवकाळी’ पावसाचे थैमान! हवामान विभागाचा पुन्हा इशारा, ‘या’ भागात..

spot_img

Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने आतापर्यंत लाखोंचा नुकसान झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देखील मोठा फटका बसत आहे. यातच आता पुन्हा एकदा राज्यातील विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर काही भागात तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्याना पावसाचा अलर्ट
मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, वरील चक्राकार वारे, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील तापमानाची ४३.६ अंश सेल्सिअस नोंद
राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान ४० अंशांच्या पार असून, तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची वाढ झाल्याने वाशीम, अकोला, धुळे, गडचिरोली, वर्धा येथे तापमान ४२ अंशांच्या वर आहे. मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

२२ एप्रिलचे नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
पुणे ३७.८, धुळे ४२.०, जळगाव ३९.२, छत्रपती संभाजीनगर ३८.२, परभणी ४०.२, अकोला ४२.२, अमरावती ४१.४, बुलडाणा ३७.६, निफाड ३७.३, सांगली ३८.५, सातारा ३८.७, सोलापूर ३९.२, सांताक्रूझ ३३.८, डहाणू ३४.९, रत्नागिरी ३४.५, ब्रह्मपुरी ४१.८, चंद्रपूर ४१.४, गडचिरोली ४२.०, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.६, वर्धा ४२.०, वाशीम ४३.६, यवतमाळ ४०.५. कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर २९.९, मालेगाव ३९.२, नाशिक ३६.१,

राज्यात ‘अवकाळी’ पावसाचे थैमान?
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ८५३ गावांना फटका बसला आहे. यामुळे येथील १५ हजार शेतकऱ्यांचे आठ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधीत झाली आहे. शिवाय वीज पडून तब्बल १७ जणांचा मृत्यू आणि ३२ जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...