spot_img
अहमदनगरअबब! ऐकावं ते नवलच..! हातपाय न हलवता तासंतास तरंगतोय 'कृष्णा'

अबब! ऐकावं ते नवलच..! हातपाय न हलवता तासंतास तरंगतोय ‘कृष्णा’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कृष्णाराजे पांडुरंग जगदाळे यांच्यामध्ये पोहण्याचे अनोखे कौशल्य आहे. कृष्णा हा जंगलेवाडी श्रीगोंदा कारखाना येथील पांडुरंग जगदाळे यांचा मुलगा आहे. तो पाण्यावर हातपाय न हलवता तरंगत राहू शकतो. त्याच्या पोहण्याचे प्रात्यक्षिक दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ठिक १०.१५ वा. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथील जलतरण तलाव येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सर्व मान्यवरांच्या समोर सुमारे पाऊण तास पाण्यावर हात पाय न हलवता तरंगत राहण्याचे कसब त्याने दाखवले तसेच हे करत असताना त्याने पाण्यावर सुप्तपद्मासनासारख्या अवघड आसनांचे प्रात्यक्षिक दाखवले. याआधीही श्रीगोंदा कारखाना या ठिकाणी शेतातील विहिरीमध्ये सुमारे पाच तास सलग हालचाल न करता पाण्यावर तरंगत राहण्याचे कौशल्य त्यांनी करून दाखवले आहे. भविष्यात त्याला या क्षेत्रामध्ये जागतिक विक्रम करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करायची इच्छा आहे.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, कोळगावचे प्राचार्य शहाजी हिरडे, बेलवंडीचे प्राचार्य उत्तम बुधवंत, काष्टी येथील प्राचार्य पंडित घोंगडे, उपप्राचार्य शहाजी मखरे, भाऊसाहेब गदादे, प्रा. सुदान भुजबळ, प्रा. ईश्वर नवगिरे, प्रा. साहेबराव मांडे, प्रा.संजय अहिवळे, प्रा. दत्तात्रय तवले, वसंत दरेकर, अशोक दांगडे, विलास दरेकर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थिती होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...