नगर सहयाद्री टीम
जीवनात कधी कुठली वेळ येईल ते सांगता येत नाही. नुकताच बॉलीवूडचा सुपस्टार असलेल्या सलमानच्या घरावर देखील गोळीबार झाला. अशा परिस्थितीत सलमान देखील आपल्या सुरक्षतेसाठी बुलेट प्रूफ वाहनांचा वापर करतो. जगात इतरही अनेक लोक आहेत, ज्यांना रोज जीवे मारण्याच्या धमक्या येतात. अशा परिस्थितीत या लोकांनाही त्यांच्या सुरक्षेसाठी बुलेट प्रूफ वाहन खरेदी करतात. परंतु वाहन खरेदीपूर्वी मंजुरीही घ्यावी लागते. मंजुरीसाठी कुठे आर्ज करावा लागतो? तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल, तर आम्ही तुमच्यासाठी त्याचे उत्तर घेऊन आलो आहोत.
मंजुरीसाठी कुठे करावा लागतो आर्ज?
चला तर मग जाणून घेऊया बुलेट प्रूफ वाहनांच्या संपूर्ण कुंडलीबद्दल. बुलेट प्रूफ वाहने खरेदीसाठी सरकारने कठोर नियम केले आहेत. बुलेट प्रूफ वाहनाची परवानगी सर्वांना दिली जात नाही. जर तुम्हाला बुलेट प्रूफ वाहन घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि गृह मंत्रालयाकडे आर्ज सादर करून परवानगी घ्यावी लागते.
बुलेट प्रूफ वाहनाचे वैशिष्ट्ये काय?
बुलेट प्रूफ वाहन तयार करण्यासाठी 20 ते 50 लाख रुपये खर्च येतो आणि त्यामुळे वाहनाचे वजन 300 ते 700 किलोने वाढते. बुलेट प्रूफ असलेल्या वाहनांमध्ये गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचा प्रभाव सहन करण्यासाठी स्टीलची बॉडी बसवली जाते. तसेच वाहनांच्या खिडक्यांना बुलेट प्रूफ काचा बसवल्या जातात. याशिवाय वाहनाच्या सनरूफमध्ये बुलेट प्रूफ शीटही बसवण्यात येते.
कोणती वाहने बुलेट प्रूफ बनवली जातात
बुलेट प्रूफ वाहन विकसित करण्यासाठी वाहनात काही विशेष वैशिष्ट्ये आवश्यक आहेत. ज्यामध्ये इंजिनची क्षमता बदलल्यानंतर वाढलेले वजन सहन करण्याची क्षमता. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना त्यांची वाहने बुलेट प्रूफ मिळतात, त्यापैकी बहुतेकांमध्ये टाटा सफारी, महिंद्रा स्कॉर्पिओ, मित्सुबिशी पजेरो, टोयोटा इनोव्हा, फोर्ड अवँडर, टोयोटा फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू आणि ऑडी आणि इतर काही एसयूव्हीचा समावेश आहे.