spot_img
ब्रेकिंगअखेर निवृत्ती गाडगे अडकला जाळ्यात! खासदार विखेंना दिली होती धमकी

अखेर निवृत्ती गाडगे अडकला जाळ्यात! खासदार विखेंना दिली होती धमकी

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी देणार्‍या निवृत्तीनाना गाडगे याच्यावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे. भाजपाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई झाली आहे.

मुळचा कळस येथील रहिवाशी असणारा निवृत्ती गाडगे हा पारनेर पंचायत समितीचा माजी सदस्य आहे. आमदार नीलेश लंके यांचा तो कार्यकर्ता आहे. आ. लंके हे त्याला पेढा भरवतानाचा फोटो नुकताच व्हायरल झाला होता. आपण एकनाथ शिंदे गटाचे असल्याचे गाडगे हा सांगत असला तरी तो पारनेर तालुयातील विविध व्हॉटसअप ग्रुपवर लंके यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकत आला असून लंके यांच्या विरोधात कोणी पोस्ट टाकली तर त्याला धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. कळस येथील कामे आणि विखे यांना मिळणारे साठ टक्के मतांचे लिड याबाबत प्रतिक्रीया देणार्‍या व्यक्तीला धमकावत असताना याच गाडगे याने सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती.

त्यामुळे हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले. निवृत्ती गाडगे हा नवी मुंबईत लपून बसला असल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळाल्यानंतर पारनेर पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांच्या पथकाला सोबत घेत निवृत्तीनाना गाडगे यास नवी मुंबईतून ताब्यात घेतले असल्याची माहिती पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली. गाडगे याच्याकडे अधिक चौकशी केली जाईल आणि गोळ्या घालण्याचा कट कोठे शिजला, त्याच्या सोबत अन्य कोण कोण आहे आणि त्याच्या संपर्कात कोण- कोण आले याचीही चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गाडगे हा लंके यांचा समर्थक असून त्यांच्याच इशार्‍यावर त्याने विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली असल्याची तक्रार भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिली आहे.

धमकी प्रकरणी भाजपा निषेध मोर्चा
खासदार विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी प्रकरणी भाजपाच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच धमकी देणारा व इतरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पारनेर तहसीलदार गायत्री सौंदाणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, तालुका प्रमुख विकास रोहकले, माजी सभापती काशिनाथ दाते, वसंतराव चेडे, सुनील थोरात, युवराज पठारे, अशोक चेडे, सुभाष दुधाडे, शिवाजी खिलारी, संदिप वराळ, सागर मैंड, दत्तात्रय पवार, सोनाली सालके, दिनेश बाबर, विक्रम कळमकर, शैलेश औटी, मीनाताई येणारे, लहू भालेकर, सुभाष गांधी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती ; शिक्षक नेते संजय धामणे यांचे संचालक मंडळावर गंभीर आरोप

अहमदनगर / नगर सह्याद्री - प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती, सॉफ्टवेअर खरेदीसह जाहिराती व संचालक...

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....