spot_img
अहमदनगरपुन्हा गाव हादरलं! सख्ख्या भावानं भावाला संपवल, कारण काय?

पुन्हा गाव हादरलं! सख्ख्या भावानं भावाला संपवल, कारण काय?

spot_img

कर्जत । नगर सहयाद्री
सख्ख्या भावानं आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एवढेवर न थांबता जन्मदात्या आईला देखील मारहाण केल्याचा प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली असून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.  नितीन विकास काळे (वय २८) यांची हत्या करण्यात आली असून गणेश विकास काळे असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: हिंगणगाव गावाच्या शिवारामध्ये भोसले वस्ती येथे अशोक गायकवाड यांच्या शेतातील गटनंबर ३८ मधील पडीक जमिनीवर गणेश काळे व नितीन विकास काळे हे पाल टाकून एकत्र राहत होते. ४ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गणेश काळे हा नितीन काळे यास म्हणाला की, मी कामावर गेल्यावर माझ्या मुलाला मारहाण करतो, त्याच्यासोबत सतत भांडणे का करतो. यावरून आपसामध्ये वाद सुरू झाले.

वादाचे रूपांतर हाणामारीत कधी झाले हे समजलेच नाही. यावेळी लाकडी दांडक्याने गणेश काळे याने नितीन  यास डोक्यात जोराने प्रहार केला. यात नितीन काळे हा मरण पावला. विशेष म्हणजे या दोन भावांमधील वाद सोडवताना त्यांची आई रिबीना विकास काळे या देखील यामध्ये जखमी झाल्या असून त्यांना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कोहिनूर साहेबराव भोसले राहणार परिटवाडी यांच्या फिर्यादीवरून गणेश विकास काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...