सुपा / नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताध्यक्ष खा सुनील तटकरे, नगर दक्षिण जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, अहमदनगर जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, जेष्ठ नेते मधुकरराव उचाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी पाडळी रांजणगाव येथील सरपंच विक्रमसिहं कळमकर यांची तर युवक तालुका अध्यक्ष म्हणून शिरापुरचे सरपंच भास्कर उचाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी अजित पवार यांनी १ तासाचा वेळ देत पारनेर येथून गेलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत पारनेर तालुक्यातील राजकीय स्थितीबाबत कळमकर यांच्याकडून आढावा घेतला.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विक्रमसिहं कळमकर,युवक तालुका अध्यक्ष भास्कर शिरोळे यांच्या निवडीचे आमदार संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत दादा गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुकर उचाळे मा. नगराध्यक्ष विजय औटी,यांनी अभिनंदन केले आहे.
विक्रमसिहं कळमकर अनेक वर्षांपासून अजितदादांच्या संपर्कात
नवनिर्वाचित पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिहं कळमकर हे अनेक वर्षांपासून अजित दादा यांच्याशी कामाच्या माध्यमातून संपर्कात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता पर्यंत निष्ठेने काम केले असून त्यांच्या निष्ठेचे आज फलित झालेआहे.
बाळासाहेब नाहाटा (जिल्हाअध्यक्ष, नगर दक्षिण)
पक्ष वाढीसाठी कटिबद्ध राहणार
९ वर्षांपूर्वी मला अजितदादांनी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. गेली अनेक वर्षे माझी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी आणि आतापर्यंत आपण केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद अजितदादांनी घेतली व माझ्यावर नव्याने राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणुन काम करताना अजितदादा,व बाळासाहेब नाहाटा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना व जेष्ठ नेत्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी कटिबद्ध राहील.
– विक्रमसिहं कळमकर ( नवनिर्वाचित तालूकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर तालुका)