spot_img
अहमदनगरअहमदनगर हादरले! प्रियकराचा निर्घृण खून करत युवतीवर अत्याचार, कुठे घडला प्रकार?

अहमदनगर हादरले! प्रियकराचा निर्घृण खून करत युवतीवर अत्याचार, कुठे घडला प्रकार?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
प्रियकराचा खून करून गोणीत घालून पाण्यात फेकले, व प्रेयसीवर अत्याचार केल्याची घटना कोपरगाव तालुयात कोळपेवाडी येथे घडली. नागेश ऊर्फ नाग्या शिवराम चव्हाण असे आरोपीचे नाव असून तीन आरोपींविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अर्जुन पिंपळे, चांदणी पिंपळे, व आणखी एक (नाव माहित नाही) अशी आरोपींची नावे आहेत. पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी : फिर्यादी मुलीचे व मृत नागेश या दोघांचे प्रेमसंबंध होते. मृत नागेश याने पीडितेस त्याच्या मोटार सायकलवरून कोळपेवाडी येथील त्याचा मित्र आरोपी अर्जुन ऊर्फ भुर्ज्या गोपाल पिंपळे व आरोपी चांदणी पिंपळे यांचे घरी आणले होते व रात्री ते झोपले असता मृत नागेश चव्हाण व आरोपी अर्जुन पिंपळे हे एका खोलीत तसेच फिर्यादी मुलगी व आरोपी चांदणी पिंपळे हे दुसर्‍या एका खोलीत झोपलेले होते. मृत नागेश चव्हाण हा पहाटे उठला व फिर्यादी जवळ जात बळजबरी करू लागला.

तिचा आवाज ऐकून चांदणी पिंपळे फिर्यादी जवळ आली. यावेळी नागेश व अर्जुन यांत वाद सुरु झाले. त्यावेळी चांदणी पिंपळे हिने आरोपी भुर्ज्याचा मित्र भाऊ (पूर्ण नाव माहित नाही) याला बोलावून घेतल्याने तो तिथे आला. त्या दोघांनी नागेशचा गळा दोरीने आवळून खून केला. अर्जुन पिंपळे याने पीडितेस चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तीनही आरोपीनी संगनमताने नागेश चव्हाण याचा मृतदेह गोणीत भरला व त्याला पाण्यात टाकून दिले. अर्जुन पिंपळे याला पोलिसांनी अटक केली असून पोलीस आणखी दोघांचा शोध घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“राष्ट्रपती महोदया, आम्हाला खून करण्याची परवानगी द्या…” ‘त्या’ पत्राने उडाली खळबळ

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे राष्ट्रपतींना धक्कादायक पत्र मुंबई /...

डागळली : पोलिसांची खाकीवर्दी अन्‌‍ मास्तरांची शाळाही!

हवालदार कसला नामचीन गुंडाच | संदीप चव्हाण हा तर पोलिस दलाचा काळीमाच | भुजबळ...

‘टाकळी’ चंदन तस्करीचे केंद्रबिंदू! कोटीचा कंटेनर मास्टरमाईडच्या आदेशाने दोन लाखांसाठी धावला…

पारनेर | नगर सह्याद्री रक्तचंदनाची कंटेरमधून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन चंदन तस्करांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर...

‌‘मनीमॅक्स‌’ च्या नावाखाली संदीपने घातला साडेआठ कोटींना गंडा!

पारनेर | नगर सह्याद्री:- मनीमॅक्स फायनान्सीअल ॲडव्हायझर प्रा. लि. ही कंपनी कंपनीच्या माध्यमातून जादा परतावा...