spot_img
ब्रेकिंगलाखो रुपयांच्या कारची काळजी कशी घेता? आठवड्यातून दोनदा कार धुणे अयोग्य? वापरा...

लाखो रुपयांच्या कारची काळजी कशी घेता? आठवड्यातून दोनदा कार धुणे अयोग्य? वापरा ’या’ टिप्स आणि करा चकाचक

spot_img

नगर सहयाद्री टीम-
कारच्या देखभालीबाबत लोकांना अनेकदा अनेक प्रश्न पडतात, त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आठवड्यातून किती वेळा कार धुवावी. याशिवाय काही लोकांना प्रश्न पडतो की गाडी स्वतः धुवावी का? तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल, तर त्याचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तसेच येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कार धुण्याव्यतिरिक्त धूळ काढण्यासाठी काय वापरू शकता.

कोणत्याही कारची किंमत लाखात असते. मध्यमवर्गीय कुटुंब आपल्या संपूर्ण आयुष्यात एकच कार खरेदी करते. अशा परिस्थितीत ही कुटुंबे आयुष्यभर आपल्या कारची खूप देखभाल करतात आणि त्यांना तिच्या देखभालीची नेहमीच काळजी असते. त्यामुळे कार मेन्टेनन्सशी संबंधित काही टिप्स माहितीअसल्या पाहिजे.

आठवड्यातून दोनदा कार धुणे अयोग्य?
आठवड्यातून दोनदापेक्षा जास्त कार कधीही न धुणे चांगले. आपण जितके जास्त कार धुतो तितके कारच्या पँटचा वरचा थर खराब होतो आणि त्यामुळे कारची चमक कमी होते. कारमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचते आणि त्यामुळे कालांतराने गंज पकडतो. पावसाळ्याच्या दिवसात गाडी झाकून ठेवली, तर बरे असते. असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की जर तुम्ही आठवड्यातून दोनदा गाडी धुत नसाल तर धुळीच्या समस्येला कसे सामोरे जाल? त्यामुळे यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे चांगल्या दर्जाचा कार डस्टर खरेदी करणे. आता इतक्या चांगल्या दर्जाचे डस्टर येऊ लागले आहेत, की तुम्हाला जास्त वेळ गाडी धुण्याची गरज भासणार नाही.

कार पुसन्यासाठी मायक्रो फायबर कापडच योग्य
जर तुम्ही कार धुत असाल तर अशा परिस्थितीत साबण आणि कापडाने पुसणे खूप महत्वाचे आहे. बरेच लोक सामान्य शैम्पू वापरतात, ते विचार करतात की ते डिटर्जंटपेक्षा चांगले आहे. डिटर्जंट सर्वात वाईट आहे, अगदी सामान्य शैम्पू देखील कारची चमक खराब करतो. त्यामुळे फक्त कार वॉश शैम्पू वापरा. कपड्याचा विचार केला, तर अनेकांना सुती कपडे चांगले वाटतात. पण जितक्या वेळा सुती कापड वापरले जाईल तितकी गाडीची चमक कमी होते. त्यामुळे मायक्रो फायबर कापड वापरणे चांगले.

रबर पेंट मुळे वाढते कारचे आयुष्य
तुम्ही कारच्या रंगाची आणि तिची चमक याची जितकी काळजी घेता, तितकीच तुम्ही कारच्या खालच्या बाजूचीही काळजी घेतली पाहिजे. वास्तविक, जेव्हा तुम्ही रस्त्यावर कार चालवता तेव्हा काही वेळा गाडीच्या खालच्या भागात चिखल अडकतो. जे जास्त काळ ठेवल्यास गंज पकडतो. अशा स्थितीत जर तुम्हाला कारच्या खालच्या भागामध्ये रबर पेंट केले तर तुमच्या कारचे आयुष्य वाढेल. याशिवाय कारमध्ये गंज येण्याचा धोकाही कमी होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...