spot_img
ब्रेकिंगराज्यात मुसळधार पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अर्लट

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अर्लट

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
मागील दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गारपीट आणि वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट व वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा दिला आहे.

विदर्भात तापमानाचा पारा वाढत असतानाच अवकाळीचे नवे संकट पुन्हा येऊन उभे ठाकले आहे. तापमानाने विदर्भात जवळजवळ चाळीशी गाठली असतानाच अवकाळीचा तडाखा सुरू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वार्‍यासह पाऊस, गारपिटीचा इशारा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.

उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शयता आहे. विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या चक्राकार वार्‍यांपासून दक्षिण तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे रविवारी विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह वादळी पाऊस गारपिटीने हजेरी लावली.

नागपूर शहरात शनिवारी वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची पडझड झाली. तर काही परिसरात गारपीट झाली. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. आज, मंगळवारी देखील पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...