spot_img
ब्रेकिंगकाय सांगता! तब्बल ९०० एकरमध्ये जरांगे यांची जंगी सभा, लोकसभेपूर्वी 'या' गावात...

काय सांगता! तब्बल ९०० एकरमध्ये जरांगे यांची जंगी सभा, लोकसभेपूर्वी ‘या’ गावात कोट्यवधी मराठे एकवटणार

spot_img

Maratha Reservation News: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला आहे. सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत.

सरकारनं सगे-सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करून गुंड शाही आणि दडपशी सुरू केली आहे. त्यामुळे कोट्यवधी मराठा समाज पुन्हा एकवटणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे.

मराठा समाजाने दानवेंसह, कुचेंना माघारी पाठवले
ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना जालन्यात मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील एका गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे आले असता, त्यांना मराठा तरुणांनी थेट गाडीतूनच माघारी पाठवले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...