PM Ujjwala Yojana : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने निवडणूक भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना अनुदान मंजूर केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 10 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे.
सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत प्रत्येक सिलिंडरवर 300 रुपये अतिरिक्त अनुदान आणखी 1 वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सबसिडी केवळ 31 मार्च 2024 पर्यंत उपलब्ध होती, ती आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2024-25 साठी पंतप्रधान उज्ज्वला योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले होते. अत्ता उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना अनुदान मंजूर केले आहे.