spot_img
अहमदनगरसैनिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी व्यवहारे, उपाध्यक्षपदी मापारी

सैनिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी व्यवहारे, उपाध्यक्षपदी मापारी

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव व्यवहारे तर उपाध्यक्षपदी जयसिंग मापारी यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. सैनिक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ संचालकापैकी ११ जागा बिनविरोध झाल्या होत्या. या ६ जागेसाठी निवडणूक पार पडली. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर व साह्य. अधिकारी राजेंद्र वाघमोडे संजय कोरडे यांनी काम पाहिले. सैनिक बँकेच्या सभागृहात शनिवारी (२ मार्च) ही निवड झाली.

या निवडीवेळी माजी व्हा. चेअरमन संतोष गंधाडे, कारभारी पोटघन, बाळासाहेब नरसाळे, बाळासाहेब हिलाळ, अशोक खोसे, संजय तरटे, शिवाजी सुकाळे, राजेंद्र जगताप, हरिभाऊ खेडकर, संतोष मापारी, दत्तात्रय सोले पाटील, मधुकर साळवे, बाळासाहेब मते, लीलावती गायकवाड, अनिता भोगाडे, नगरसेवक युवराज पठारे, भाऊसाहेब भोगाडे, माजी सरपंच लाभेल औटी आदींसह सभासद उपस्थित होते.

सर्व सभासदांना व संचालकांना बरोबर घेऊन पुढील कारभार करण्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांनी दिली. तर संचालकांना विश्वसात घेऊन या पुढील काळात सर्व निर्णय घ्यावे अशी अपेक्षा नूतन संचालक कारभारी पोटघन व बाळासाहेब नरसाळे यांनी व्यक्त केली. नूतन अध्यक्षांचे आ.नीलेश लंके, राणी लंके, दीपक लंके, सभापती बाबाजी तरटे आदींनी अभिनंदन केले.

शिवाजी व्यवहारेंची अध्यक्षपदाची हॅट्रिक
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणूकीत शिवाजी व्यवहारेंना तिसर्‍यांदा संधी मिळाली. तर संचालक पदासाठी शिवाजी व्यवहारेंना चौथ्यांदा संधी दिली आहे. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांनी विशेष प्रयत्न केले असून अनेक न्यायालयीन लढाया व आरोंपांना वेळोवेळी त्यांना सामोरे जावे लागले. तरीही बँकेच्या हिताचा विचार करत त्यांनी चांगले काम सुरु ठेवले. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाची हॅट्रिक साधली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...