spot_img
अहमदनगर...हे तर कापूस चोर? फिल्मीस्टाईलने पाठलाग करत 'अशा' ठोकल्या बेड्या

…हे तर कापूस चोर? फिल्मीस्टाईलने पाठलाग करत ‘अशा’ ठोकल्या बेड्या

spot_img

शेवगाव। नगर सह्याद्री
बळजबरीने कापूस चोरून नेणारे चौघे शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरुन नेलेला १० क्विंटल कापूस, गुन्हयात वापरलेले वाहने असा ९ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. भानुदास बाबुराव गायकवाड, राजू दत्ता बर्डे, विवेक योगराज पाटील, किरण कचरु मोहिते असे अटक आरोपींची नावे आहेत. संदीप वाघमारे व बळीराम फुगे हे दोघे फरार झाले आहेत.

अधिक माहिती अशी : २७ फेब्रुवारी मध्यरात्री शेवगाव पोलीस ठाण्याचे नाईट राउंड अंमलदार चापाहेका बडे, पोकॉ संतोष वाघ, होमगार्ड मतीन असरफ बेग आदींना अन्नपूर्णा जिनींगच्या भिंतीलगत काही इसम संशयीत रित्या फिरतांना आढळून आले. होमगार्ड मतीन बेग यांनी जिनींग मधील मॅनेजर मजीब महेबुब शेख यास फोन करुन उठवले. मजीब शेख हे बाहेर आले तेव्हा त्यांना चार चोरटे कापूस गोण्यामध्ये भरतांना दिसले.

चोरटयांनी त्यास हातातील चाकू व टामीचा धाक दाखवून शांत बसण्याची धमकी दिली. तरीही मुजीब शेख याने आरडा ओरडा केल्याने चोरटे पळून गेले. पेट्रोलींग करणार्‍या पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना शिताफीने पकडले. त्यांना पकडल्यानंतर जिनींग जवळ पाहणी केली असता तेथे मोटार सायकली, कापसाने भरलेल्या गोण्या व भोत व काही अंतरावर पांढरे रंगाची विनानंबरची पिकअप आदी मुद्देमाल सापडला. मुजीब महेबूब शेख रा. नाईकवाडी मोहल्ला शेवगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोलीस उप निरीक्षक निरज बोकील, पोलीस उप निरीक्षक अमोल पवार, पोहेकॉ दराडे, चालक पोहेकॉ बडे, पोहेकॉ काळे, पोकॉ संतोष वाघ, पोकों शाम गुंजाळ, पोकों अमोल ढाळे, पोकों संपत खेडकर, पोकॉ एकनाथ गरकळ, पोकों कृष्णा मोरे, पोकॉ राहुल खेडकर, होमगार्ड मतीन बेग, मोहिते, शिंदे, नयीम सय्यद, महेश घाडगे, रवी बोधले, होमगार्ड पांडुरंग दहिफळे आदींनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...