spot_img
अहमदनगरAhmednagar News : अहमदनगर शहरात सुरु होती स्फोटक पदार्थाची विक्री ! 'त्या'...

Ahmednagar News : अहमदनगर शहरात सुरु होती स्फोटक पदार्थाची विक्री ! ‘त्या’ व्यापाऱ्यावर पोलिसांची मोठी कारवाई

spot_img

 अहमदनगर / नगर सह्याद्री : कोतवाली पोलिसांनी विनापरवाना बेकायदेशीर रित्या कॅल्शीयम कार्बाईड नावाचा ज्वलनशील व स्फोटक पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. रोहीत नवनीत चुत्तर (वय 31 वर्षे, रा. बुरुडगल्ली, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे. मे.एन.सुरेशलाल अँड कंपनी या दुकानामधून 12 हजार 650 रुपयांचा 115 किलो कॅल्शीयम कार्बाईड पदार्थ जप्त केला.

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना वरील दुकानात विनापरवाना कॅल्शीयम कार्बाईड विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक दराडे यांच्या सूचनेनुसार  सहा.पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी पोलीस पथकासह याठिकाणी छापा टाकला. 115 किलो कॅल्शीयम कार्बाईड जप्त केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनिरी.महेश जानकर, गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ. तनवीर शेख, भानुदास सोनवने, शाहीद शेख, संदिप पितळे, पो.ना. अविनाश वाकचौरे, मपोना संगीता बडे आदींच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...