spot_img
महाराष्ट्रअत्याचाराच्या आरोपात जेल..शांत डोक्याने गोळीबाराचे प्लॅनिंग..कोण आहे घोसाळकर यांची हत्या करणारा मॉरिस...

अत्याचाराच्या आरोपात जेल..शांत डोक्याने गोळीबाराचे प्लॅनिंग..कोण आहे घोसाळकर यांची हत्या करणारा मॉरिस भाई?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याने राज्यात खळबळ उडाली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला असल्याचे सर्वश्रुत आहे.

मॉरिस नोरोन्हा याने केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गोळीबारानंतर मॉरिस नोरोन्हा याने स्वतःलाही संपवले. मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हत्या, अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. मॉरिस नोरोन्हा याच्यावर 80 लाख रुपयांची फसवणूक, महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा,धमकी देण्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.

कोण आहे मॉरिस भाई ?
मॉरिस नोरोन्हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता समजायचा, परिसरातील लोक त्याला मॉरिस भाई या नावाने ओळखत होते. बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसरात समाजसेवक कार्यकर्ता म्हणून मॉरिसची ओळख होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि मॉरिसमध्ये वाद सुरू होता. हा वाद संपवण्यासाठी दोघांनी फेसबुक लाईव्ह केले. अनेक नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मॉरिस नोरोन्हा स्वत:ला वर्णन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ता म्हणतो. कोविडच्या काळात त्याला काही पुरस्कारही मिळाले आहेत अशी माहिती मिळाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...