उत्तराखंड / नगर सह्याद्री : समान नागरी संहिता बाबत सध्या देशात चर्चा सुरु आहेत. परंतु आता देशातील एक राज्य असे असणार आहे की जेथे समान नागरी संहिता लागू होणार आहे.
उत्तराखंड हे राज्य समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य असणार आहे. याबाबत मसुदा तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने शुक्रवारी आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासमोर सादर करण्यात आला. विधानसभेत हे विधेयक मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात या मसुद्यावर चर्चा होईल.
UCC ड्राफ्टमध्ये काय काय? –
– घटस्फोटासाठी सर्व धर्मीयांसाठी समान कायदा असेल.
– घटस्फोटानंतर पालनपोषणाचा नियम समान असेल.
– दत्तक घेण्यासाठी संदर्भात सर्व धर्मांसाठी समान कायदा असेल.
– संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार सर्व धर्मासाठी लागू असेल.
– मुलीने दुसऱ्या धर्मात अथवा जातीत लग्न केले, तरी तिचा हक्क कायम राहील.
– सर्व धर्मात मुलेचे विवाहाचे वय 18 वर्ष असणे अनिवार्य असेल.
– लिव्ह इन रिलेशनशिपसाठी नोंदणी आवश्यक असेल.
– राज्यातील अनुसुचित जमाती या कायद्यात येणार नाहीत.
– एक पती-पत्नीचा नियम सर्वांना लागू होईल.