अहमदनगर : कर्ज फेडण्यासाठी दहा लाख रुपये माहेरून आणावेत यासाठी डॉटर असणार्या पतीकडून पत्नीचा छळ झाल्याची घटना घडली आहे. पुष्पा तुषार नवले यांनी याबाबत फिर्याद दिली. पती तुषार गोरख नवले, सासू रंगुबाई गोरख नवले, सासरे गोरख बजाबा नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पुष्पा यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, १२ जुलै २०१६ रोजी तुषार गोरख नवले यांच्यासह विवाह झाला होता. कौटुंबिक कारणातून आमच्यात वादविवाद होत होते. तुषार नवले हे व्यवसायाने डॉटर असून श्रीगोंदे येथे त्यांचे लिनिक आहेत. त्यांनी विविध बँकेतून माझ्या नावे कर्ज घेतलेले होते.
या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मारहाण केली. पती मला सोडून नगरमध्ये का राहतात? इतके कर्ज का घेतात याबाबत सासू सासर्यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पतीने माझ्यावर भरपूर कर्ज झाले आहे ते फेडण्यासाठी मला १० लाख रुपयांची आवश्यक्ता असल्याने तू तुझ्या घरून पैसे आन अन्यथा कायमची निघून जा असे सांगितले. याला काही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी मला शिवीगाळ मारहाण केली. मी वडिलांना याबाबत सांगितले, ते घरी समजूत काढण्यासाठी आले असता त्यांना व मला बाहेर काढून दिले असे फिर्यादीत म्हटले आहे.