spot_img
महाराष्ट्रशरद मोहळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे ताब्यात, चार राज्यात फिरला,पण...

शरद मोहळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे ताब्यात, चार राज्यात फिरला,पण…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. गँगवारमधून झालेल्या या हत्या प्रकरणानंतर पुणे हादरले होते. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे या पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश मारणे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. गणेश मारणे तुळजापूर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिस तुळजापुरात दाखल झाले. परंतु तो पुढे कर्नाटक गेला. यामुळे गुन्हे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये पोहचले.

परंतु पुन्हा एकदा गणेश मारणे याने पोलिसांना चकवा दिला. तो कर्नाटकमधून केरळमध्ये पसार झाला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ओडिशा राज्यात गेला. तेथून पुन्हा नाशिकमध्ये आला. अखेर पोलिसांनी सापळा लावत मारणेसह त्याच्या साथीदारांना मोटारीतून जात असताना पकडले. त्यांना मोशी टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती ; शिक्षक नेते संजय धामणे यांचे संचालक मंडळावर गंभीर आरोप

अहमदनगर / नगर सह्याद्री - प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती, सॉफ्टवेअर खरेदीसह जाहिराती व संचालक...

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....