spot_img
अहमदनगरAhmednagar News : ऊसतोड सुरु असतानाच आढळले बिबट्याचे बछडे, अहमदनगरमधील 'या' गावात...

Ahmednagar News : ऊसतोड सुरु असतानाच आढळले बिबट्याचे बछडे, अहमदनगरमधील ‘या’ गावात खळबळ

spot_img

सुपे / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील रूईछत्रपती येथे ऊसतोडणीचे काम सुरू असताना मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. अचानक बिबट्याची बछडे आढळून आल्याने मजूरांसह परिसरातील शेतकरी भयभीत झाले. या वेळी वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र पारनेर यांच्याकडून ऊसतोडणी तात्पुरती थांबवण्यात आली.

पारनेर तालुक्यातील रूईछत्रपती शिवारात सध्या उसतोडणीचे काम सुरू आहे. पाझर तलावाखाली पांदन रस्त्यालगत परिसरात शेतकरी दिनकर रावसाहेब दिवटे यांच्या शेतातील ऊस मजूर तोडत असताना तीन बछडे आढळून आले. याबाबत मजुरांनी शेत मालकाला या घटनेची माहिती दिली. दिवटे यांनी ही माहिती वनविभागाला दिली.

घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक उमा केंद्रे यांनी उपस्थित ग्रामस्थांना बिबट्या विषयी माहिती देत जनजागृती केली. पशुवैद्यकीय अधिकारी वाळवणे यांना पाचारण करून या पिल्लांची तपासणी केली. त्या बछड्यांना ज्या ठिकाणी ती मिळाली त्याच ठिकाणी व्यवस्थित कॅरेट मध्ये आईसोबत पुनर्मिलनासाठी ठेवली.

केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्याच्या तिन्ही पिल्लांना वनविभागाद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. मादी बिबट्या व पिल्लांवर नजर ठेवण्यात आली आहे. रुईछ्त्रपती येथील टेंभी तलावालगत शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने यंदा उसाची लागवड करण्यात आली. ऊस सध्या तोडणीला आल्यामुळे मजुरांकडून आठ दिवसांपासून तोड सुरु आहे.

दिवटे यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना बिबट्याचे बछडे आढळून आल्याने आणखी किती बछडे व नर, मादी याठिकाणी आहेत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. आपल्या बछड्यांना घेण्यासाठी नर किंवा मादी येईल त्यासाठी ते आहे त्याच ठिकाणी ठेवले असून वनविभागाच्या वतीने नजर ठेवण्यात आली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...