spot_img
अहमदनगरAhmednagar News : कोयता हातात घेऊन नगर शहरात दहशत, पोलिसांनी त्यासोबत केले...

Ahmednagar News : कोयता हातात घेऊन नगर शहरात दहशत, पोलिसांनी त्यासोबत केले ‘असे’ काही

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : कोयता हातात घेऊन दहशत करणारा व तीन महिन्यापासुन अत्याचाराच्या गुन्ह्यात पसार असलेल्या संशयित आरोपीला तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे.

नगर शहरातील कोठला घासगल्ली भागात सुलभ शौचालय येथे एक व्यक्ती हातात कोयता घेवुन परिसरात मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करून दहशत निर्माण करत असल्याची माहिती शनिवारी (दि. 27) रात्री साडेआठ वाजता मिळताच पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संदीप उर्फ बाला राजु घोरपडे (वय 19 रा. घासगल्ली, कोठला) असे सांगितले. याला ताब्यात घेत त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या एका कारवाईमध्ये तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयिताला ताब्यात घेत अटक करण्यात आली. अशिष सिध्दनाथ प्रजापती (वय 23 रा. भगवान बाबा चौक, सारसनगर) असे त्याचे नाव आहे. सारसनगर येथे चहाच्या टपरीवर चहा घेत असताना त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.

सदरची कारवाई निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश मोरे, संदीप धामणे, वसिम पठाण, सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, शिरिष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, बाळासाहेब भापसे यांच्या पथकाने केली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...