spot_img
राजकारणराष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून सर्वात मोठा निर्णय, पहा..

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून सर्वात मोठा निर्णय, पहा..

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : महाराष्ट्रात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आता राष्ट्रवादीबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज (२९ जानेवारी) याबाबत सर्वोच्च न्यायालायने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालायने मुदत दिली आहे. राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीन आठड्यांचा वेळ मागितला होता. पण वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याला विरोध केला. वेळ वाढवून मागणं हे नेहमीच होत आहे, त्यामुळे एकच आठवड्याची मुदत द्यावी असं मनु सिंघवी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालायने नार्वेकरांना तीन नाही, दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे. तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं की, 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल. पण निकाल लिहिण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ द्या. पण कोर्टाने मात्र त्यांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे.

31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल” अशी हमी तुषार मेहता यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...