spot_img
अहमदनगरश्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने गुंडेगावात भव्य सोहळा

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने गुंडेगावात भव्य सोहळा

spot_img

गुंडेगाव। नगर सह्याद्री
आयोध्येत साजरा होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे भव्य श्रीराम सोहळा साजरा होणार असून, त्या निमित्ताने गुंडेगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्याचा संकल्प केला असुन जय्यत तयारी केली आहे.

गावातील तरुणांनी प्रत्येकाच्या घरी कलश अक्षता व निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे. प्रभु श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी लोकसभगातुन गावातील मुख्य चौकातील श्रीराम व्यासपीठ, श्रीराम मंदिर , हनुमान मंदिरांची सुंदर कलाकुसर रंगरंगोटी केली आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दि.२२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता श्रीराम प्रभुची अभिषेक पुजा करण्यात येणार आहे.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात ९ वाजता भव्य दिव्य प्रभु श्रीरामांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर भागवतचार्य ह.भ.प महेशजी मडके महाराज (नेवासा ) यांच्या सुश्राव्य रसाळ वाणीतून सकाळी १० ते १२ या वेळेत किर्तन होणार आहे. यावेळ ह.भ.प मडके महाराज यांच्या हस्ते भगव्या ध्वजारोहण होऊन भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठापना उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व राम भक्त गुंडेगाव ग्रांमस्थ व हनुमान चालीसा पठण कमटिच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...