spot_img
अहमदनगरAhmednagar: ..हे तर गैरवर्तन!! 'सरपंचाशी' हुज्जत, गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Ahmednagar: ..हे तर गैरवर्तन!! ‘सरपंचाशी’ हुज्जत, गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर। नगर
शाळेच्या आवारात थांबण्यास विरोध केल्याच्या रागातून तरूणाने महिला सरपंचासोबत हुज्जत घालून गैरवर्तन केले. पतीसह दोघांना मारहाण केल्याची घटना गुरूवारी (दि. १८) नगर तालुयातील एका गावात घडली.

या प्रकरणी पीडित महिला सरपंच यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अविष्कार पेत्रस जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत फिर्यादीचे पती, दीर व चुलत दीर जखमी झाले आहेत.

गुरूवारी सकाळी अविष्कार गावातील शाळेच्या परिसरात होता. तेव्हा फिर्यादीचे पती त्याला म्हणाले, तुझ्यामुळे शाळेचे नाव खराब होते, मुला-मुलींना त्रास होतो.

पुतण्याला घेऊन फिरतो म्हणून शाळेचे नुकसान होते. पुतण्याला घेऊन फिरू नको, शाळेच्या आवारात थांबू नको.’ याचा राग आल्यो अविष्कारने फिर्यादीसोबत हुज्जत घालून गैरवर्तन केले. फिर्यादीच्या पतीला मारहाण केली. दीर व चुलत दीर यांना दगड, विटाने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...