spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : अजित पवारांची अहमदनगरमध्ये मोठी खेळी ! उद्धव ठाकरेंना धक्का...

Ahmednagar Politics : अजित पवारांची अहमदनगरमध्ये मोठी खेळी ! उद्धव ठाकरेंना धक्का देत ‘तो’ नेता राष्ट्रवादीत

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यात अजित पवार यांनी आपली ताकद वाढवण्यासाठी मोठी खेळी सुरु केली आहे. आता त्यांनी उद्धव ठाकरे याना धक्का देत त्यांचा एक शिलेदार गळाला लावला आहे.

ठाकरे गटाचे अकोले तालुकाप्रमुख डॉक्टर मनोज मोरे यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवारांच्या मुंबई स्थित देवगिरी बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या पुढाकाराने धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटात प्रवेश केला. अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, आमदार किरण लहामटे हे यावेळी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...

ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज : मंत्री विखे पाटील

निघोज / नगर सह्याद्री ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा...