spot_img
अहमदनगरAhmednagar: बळीराजाला खुशखबर!! ‘या’ योजनेच्‍या माध्‍यमातून ४ कोटी ७१ लाख मंजुर

Ahmednagar: बळीराजाला खुशखबर!! ‘या’ योजनेच्‍या माध्‍यमातून ४ कोटी ७१ लाख मंजुर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील मदती करीता दाखल झालेल्‍या प्रलंबित प्रस्‍तावांना मंजुरी मिळाली असून, नगर जिल्‍ह्यातील २४१ शेतक-यांना या योजनेच्‍या माध्‍यमातून ४ कोटी ७१ लाख रुपयांची रक्‍कम मंजुर झाली असल्‍याची माहीती मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

शेती व्‍यवसाय करताना होणारे अपघात तसेच रस्‍त्‍यावरील अपघात व विविध कारणांनी शेतक-यांच्‍या होणा-या मृत्‍युच्‍या घटना तसेच या घटनांमध्‍ये अपंगत्‍व आल्‍यास संबधित कुटूंबाला आर्थिक मदतीचा लाभ मिळावा म्‍हणून राज्‍य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली आहे.

या योजनेचा लाभ मिळावा म्‍हणून २३ ऑगस्‍ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीत राज्‍यातील २ हजार १३७ प्रस्‍ताव मंजुरीसाठी दाखल करण्‍यात आले होते. यामध्‍ये नगर जिल्‍ह्यातील २४१ प्रस्‍ताव सादर करण्‍यात आले होते. यामध्ये २३० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या आणि ११ शेतकर्यांना अंपगत्व आल्याच्या घटनांचा समावेश आहे.

जिल्‍ह्यातील २४१ कुटूबांना समारे ४ कोटी ७१ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळण्‍याचा मार्ग सुकर झाला आहे. अपघाती मृत्‍यु झाल्‍यास रुपये २ लाख व अपंगत्‍व आल्यास रुपये १ लाख रुपयांची मदत या योजनेच्‍या माध्‍यमातून दिली जात असल्याचे जिल्‍हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...

संक्रातीच्या मध्यरात्री घटना; दोन तरुणांचा मृत्य, चौघांवर उपचार सुरू…नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथे चालकाचा कारवरील ताबा...

मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का; अजितदादांचा मोठा निर्णय..

बीड । नगर सहयाद्री:- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन...

आमदार जगताप यांनी दिला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा; कारण आलं समोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून कारभार करत असताना अचानक पद्धतीने पाणीपट्टी...