अयोध्या / नगर सह्याद्री : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. यासाठी आता सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला आतापर्यंत ५५०० कोटी रुपयांचे दान मिळाले असल्याची माहिती मिळालीये.
यात दोन अशा व्यक्ती आहेत ज्यांनी प्रत्येकी ११ कोटी रुपयांचे दान दिलेय.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत पाच हजार कोटींहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत. राम मंदिर ट्रस्टने देशातील ११ कोटी लोकांकडून ९०० कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, आत्तापर्यंत राम मंदिरासाठी ५५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त दान मिळाले आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, आतापर्यंत सुमारे १८ कोटी राम भक्तांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी विविध बँक खात्यांमध्ये सुमारे ३२०० कोटींचा समर्पण निधी जमा केला आहे. ट्रस्टने या बँक खात्यांमध्ये जमा केलेल्या निधीची एक एफडी केली होती. या एफडीच्या व्याजातून राम मंदिराचे सध्याचे स्वरूप साकारण्यात आले आहे, असे समजते.