अहमदनगर। नगर सहयाद्री
शहरातून एका विवाहितेचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालीदा भाऊसाहेब साबळे (रा. झोपडी कैन्टींग, नगर), मालन बाळासाहेब गायकवाड (रा. मुलेमानदेवळा ता. आष्टी, जि. बीड), सुलोचना दत्तात्रय गाडे (रा. दादेगाव ता. आष्टी, जि. बीड), पोपट अबाजी खुडे (रा. केडगाव, नगर), प्रशांत आबाजी खुडे, भिमराव श्रावण अढागळे (दोघे रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी विवाहिता मुळच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून त्या सध्या सावेडी उपनगरात भाडोत्री बंगल्यात एकट्याच राहतात. त्यांचे पती कामानिमित्त मुंबई येथे व दोन मुली बडिलांकडे आष्टी तालुक्यातील एका गावात राहतात. नाजूक कारणावरून सहा जणांनी फिर्यादी विवाहितेला नगरमधून रिक्षातून नगर शहरातील चांदणी चौक येथे व तेथून टेम्पोतून धानोरा येथे अपहरण करून येथे डांबून ठेवले.
तेथे गेल्यानंतर सर्वांनी पुन्हा मारहाण केली, मंगळवारी (दि. ९) दुपारी दोन वाजता कालींदा साबळे हिने फिर्यादीला घराच्या बाहेर काढून नगर येथे माळीवाडा बस स्थानकांवर सोडले. नंतर फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.