spot_img
अहमदनगरअहमदनगर: अंकुश चत्तर हत्याकांड!! शिंदे टोळीवर 'मोक्का'

अहमदनगर: अंकुश चत्तर हत्याकांड!! शिंदे टोळीवर ‘मोक्का’

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
अंकुश चत्तर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीतील भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह आठही आरोपींना मंगळवारी मोक्का न्यायालयाने गुरूवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्या खून प्रकरणानंतर नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

त्याचा तपास उपअधीक्षक खेडकर करीत आहेत. त्यांनी सुरज ऊर्फ मिया राजन कांबळे, स्वप्नील रोहिदास शिंदे, महेश नारायण कुर्‍हे, अभिजित रमेश बुलाख, मिथुन सुनिल धोत्रे, अक्षय प्रल्हादराव हाके, राजू भास्कर फुलारी, अरुण अशोक पवार या आरोपींना ताब्यात घेऊन मोक्का न्यायालयात हजर केले.

आरोपींनी संघटितपणे गुन्हे करून त्यातून आर्थिक फायदा घेत मालमत्ता जमा केली का, गुन्हे करुन मिळवलेली रक्कम कोणत्या बँकेत अथवा पतसंस्थेत जमा केली आहे का, संघटित केलेल्या विविध गुन्ह्यातील फिर्यादी व तपासी अधिकार्‍यांचे तपास व जबाब, आरोपीने त्यांच्या नातेवाइकांकडे मालमत्ता ठेवली आहे का, त्यांच्या नावावर मालमत्ता घेतली आहे का, स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने वाहने खरेदी केली का, आणखी काही गुन्हे केले का, बेनामी प्रॉपर्टीबाबत तपास करणे, यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली.

आरोपींच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले व अ‍ॅड. संजय दुशिंग यांनी बाजू मांडली. न्यायालयाने तपासी अधिकार्‍यांची मागणी मंजूर केली. दरम्यान, आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर न्यायालय आवारात मोठी गर्दी झाली होती. पोलिस अधीक्षकांनी काठी हातात घेताच जमावाने पळ काढला. त्यामुळे न्यायालयाबाहेरील रस्त्यावर काहीशी पळापळ झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...