spot_img
महाराष्ट्रPolitical News : 'निवडणूक लढणार नाही हे आता ठरवले, यापुढे...' शरद पवारांच्या...

Political News : ‘निवडणूक लढणार नाही हे आता ठरवले, यापुढे…’ शरद पवारांच्या विधानानंतर चर्चांना उधाण

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जोर लावून आहेत, भाजपला शह देण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. परंतु जागावाटपावरून त्यांच्यात एकमत होताना दिसत नाही.

राज्यातही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून धुसपूस सुरूच आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत टीका होत आहे. यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी मोठे विधान केले असून आता निवडणूक लढणार नाही, हे मी ठरवलेय असे शरद पवार यांनी म्हटलंय.

खासदरकीचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही. अडीच वर्षांनंतर माझी खासदारकी संपेल. त्यानंतर निवडणूक लढवणार नाही. माझी खासदारकीची टर्म शिल्लक असून तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथे पाठवले आहे. तिथे काम करु नको का? असा सवालही त्यांनी केला आहे. १९६७ पासून राजकारणात आहे.

माझ्या विरोधकांनीही कधी वयावरून टीका केली नाही. अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथे मी काम करत राहणार आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. राम दर्शनावरूही ते म्हणाले की, गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर जाईन.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...