spot_img
अहमदनगरAhmednagar: चॉकलेटी कॉफी शॉपचा नावाखाली 'काळा' कारभार!! 'सहा' कॅफे वर धाड

Ahmednagar: चॉकलेटी कॉफी शॉपचा नावाखाली ‘काळा’ कारभार!! ‘सहा’ कॅफे वर धाड

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगर शहरातील सहा कॅफेंवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत अश्लिल चाळे करणार्‍या अल्पवयीन मुलामुलींच्या बारा जोडप्यांसह सहा कॅफे चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईवेळी अनेक जोडपी छोट्या केबिनमध्ये अश्लील चाळे करताना आढळले. कॅफे चालक जोडप्यांना चाळे करण्यासाठी केबिन उपलब्ध करून देत त्यासाठी दर तासाला २०० रुपये दर आकारल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात कॅफेंचे पेव फुटले आहे. कॅफेच्या नावाखाली आतमध्ये छोटे छोटे केबिन मुलामुलींना अश्लील चाळे करण्यास उपलब्ध करून देण्यात येतात. स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सावेडीत श्रीराम चौक येथील लव्ह बर्डस कॅफे, कुष्ठधाम रोड येथील बाबाज् कॅफे, गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे, नगर-मनमाड रोडवरील झेड. के. कॅफे या चार व बुरुडगाव रोडवरील इगलप्राईड कॉम्प्लेसमधील गोल्डरश कॅफे व चाणय चौकातील रिजकिंग कॅफे अशा सहा कॅफेंवर छापे टाकले.

बारा ते तेरा जोडप्यांना ताब्यात घेतले. तसेच कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलीही कॉफी, पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यास केबिन बनवल्याने ऋषीकेश सखाराम निर्मळ (रा. झोपडी कॅटीन), महेश मच्छिंद्र तेलोरे, रोहित कुमार साठे, हर्षवर्धन भाऊसाहेब काकडे (सर्व रा. तपोवन रोड, सावेडी), सागर अशोक उदमले (रा. हिवरेझरे, ता. नगर), रवी रघुनाथ चौरे (रा. गायकेमळा, कल्याण रोड), अर्जुन ईश्वर कचरे (रा. कानडेमळा, सारसनगर) यांच्यावर कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तुषार धाकराव, सोपान गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...