spot_img
राजकारणखा.नवनीत राणा सहा महिन्यात जेलमध्ये जाणार? मोठी खळबळ

खा.नवनीत राणा सहा महिन्यात जेलमध्ये जाणार? मोठी खळबळ

spot_img

अमरावती / नगर सह्याद्री : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विविध समीकरणे जुळवली जात आहेत. राज्यात लवकरच आणखी काही आघाड्या, युती, पक्षबदल दिसतील. दरम्यान आता खा.नवनीत राणा लवकरच जेलमध्ये दिसतील असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

नवनीत राणा मुलुंड कोर्टात घिरट्या घालत आहेत, त्या पुढच्या 6 महिन्यांमध्ये जेलमध्ये दिसतील असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रवी राणा यांनी तुमचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. आता या निवडणुकीतही तुम्ही पाठिंबा देणार का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला.

त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला. “म्हणूनच रवी राणाची मिसेस कोर्टात घिरट्या घालत आहे, सहा महिन्यांमध्ये ती जेलमध्ये दिसेल”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

निवडणूक आयोग मनमानी पद्धतीने काम करतय
निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था असून ज्या ठिकाणी खासदार-आमदार यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी ताबडतोब निवडणूक घेतल्या पाहिजेत. सहा महिन्यांत निवडणूक घ्यायला हव्या असतात. निवडणूक आयोग मनमानी पद्धतीने काम करत आहे. निवडणूक आयोग कायद्याने वागत नाही. निवडणूक आयोग सरकारच्या इशाऱ्यावर चालत असल्याची स्थिती आहे अशीही टीका त्यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...