spot_img
ब्रेकिंगPolitics News Today: बारामतीचे भावी खासदार कोण? ठाकरे यांच्या सुनाचे झळकले बॅनर

Politics News Today: बारामतीचे भावी खासदार कोण? ठाकरे यांच्या सुनाचे झळकले बॅनर

spot_img

इंदापूर। नगर सहयाद्री-
Ankita Patil-Thackeray: बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढविणार असल्याची चर्चा असतानाच आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या व भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील (Ankita Patil-Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरमध्ये त्यांचा भावी खासदार म्हणून फलक झळकला आहे.

राज्याचे माजीमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या व युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुयात भावी खासदारचे फ्लेस झळकले आहेत. सोशल मिडीयावरही अंकिता पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. भाजपने यापूर्वीच ‘ए फॉर अमेठी’ व ’बी फॉर बारामती’ अशी घोषणा करुन २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला आहे.

भाजपने बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीतर्फे महादेव जानकर व २०१९ च्या निवडणूकीमध्ये कांचन राहुल कुल यांनी निवडणूक लढवली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची गणिते बदलली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत युती केल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप व मित्र पक्षाची ताकद वाढणार आहे.

अंकिता पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. तसेच युवकांचे संघटन सुरु आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचा जास्त प्रभाव आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढविल्यास भाजप व मित्रपक्षांना निवडणूक जिंकणे सोपे जाईल, असा राजकीय अंदाज बांधला जात आहे. अंकिता यांच्या वाढदिवसादिवशी भावी खासदार असे फ्लेस झळकल्याने अंकिता पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...