spot_img
ब्रेकिंगManoj Jarange Live Today : उद्या नव्हे 'या' तारखेला कोट्यवधी मराठे मुबंईत...

Manoj Jarange Live Today : उद्या नव्हे ‘या’ तारखेला कोट्यवधी मराठे मुबंईत जातील..! मनोज जरांगे यांच्या सभेत झाला ‘हा’ महत्वाचा निर्णय

spot_img

बीड / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये इशारा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. Manoj Jarange Live Today

मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान मनोज जरांगे उद्याच्या २४ डिसेंबर रोजी मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढणार होते. त्यावर आज या सभेत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

काय झाला निर्णय?
मनोज जरांगे पाटील यांनी उद्या मुंबईतील ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी आता २० जानेवारी रोजी तारीख ठरवली आहे. २० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. या वेळी सर्व मराठ्यांनी मला भेटायला या असे आवाहन केलं आहे. त्यामुळे सरकार आपल्याला कसे अडवेल? असा प्रश्नही त्याची विचारला आहे. त्यामुळे आता २० रोजी मराठा समाज आझाद मैदानात दाखल होईल.

३ कोटी मराठे मुंबईत येतील
२० जानेवारी रोजी मुंबईत ३ कोटी मराठे मुंबईत येतील असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मोठा जनसमुदाय याठिकाणी येईल. सर्वानी पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, आताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असून क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला कोर्ट ऐकणार आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी मोठा दिलासा आता मिळालेला आहे. 24 जानेवारीला वकिलांची तज्ज्ञ फौज बाजू मांडेल, मराठा समाज मागास कसा आहे हे सांगेल, परिस्थिती सांगेल.

सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचं काम वकिलांची फौज करेल. मला वाटतं मराठा सामाजाला न्याय मिळेल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मागच्या सरकारने मविआ सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते मांडले नव्हते. पण यावेळी निष्णात वकिलांची फौज बाजू मांडेल. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...