नगर सहयाद्री टीम-
ऑनलाईनच्या युगात प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकारी योजनांपासून तर एखाद्या हॉटेलचा रुम बुकींग करण्यापर्यंत आधार कार्ड मागितलं जातं.
अशावेळी आपल्या आधारकार्डचा क्यू आर कोड आणि आधार क्रमांकाचा वापर करत फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे.
आधारकार्ड मार्फत अनेकांचे खाते रिकामे झाल्याच्या घटना समोर येत आहे. आधारकार्डच्या क्यू आर कोडपेक्षा त्यावर असलेल्या क्रमांकाचा वापर करून फसवणुकीच्या घटना घडत आहे. त्यामुळे शासनाने मास्क आधार ही स्किम लागु केली आहे.
मास्क आधार कार्ड
आधार कार्डमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने यावर तोडगा आणला असून मास्क आधार कार्ड आणलं आहे. यामध्ये आधारचे शेवटचे फक्त ३ अंक दिसतात. बाकीचे अंक लपलेले असतात. त्यामुळे तुम्ही जर कोठेही तुमचे आधार कार्ड स्कॅन केले तर त्यातून तुमची संपूर्ण माहिती समोरच्या व्यक्तीला मिळवता येत नाही.