spot_img
महाराष्ट्रManoj jarange Patil : आता वेळेत निर्णय घ्या अन्यथा.. जरांगे पाटलांनी सरकारला...

Manoj jarange Patil : आता वेळेत निर्णय घ्या अन्यथा.. जरांगे पाटलांनी सरकारला दिला मोठा इशारा

spot_img

जालना / नगरसह्यादी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. उपोषण सोडताना सरकारने २४ तारखेपर्यंत मुदत दिली होती.

आता ही मुदत संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

जरांगे पाटील यांचा काय आहे इशारा?
“आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान करून उपोषण मागे घेत २४ तारखेपर्यंत वेळ दिला. काल त्यांनी शिंदे समितीने अंतिम अहवालही दिला. ज्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितली होती. आता 24 तारखेच्या आत कायदा करा. याच अधिवेशनात चर्चा करुन मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करावा, या निर्णयासाठी दुसरे विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नाही. अहवाल आला आहे. नोंदीही मिळाल्या आहेत. त्यामुळे दुसरे अधिवेशन बोलावण्यची गरज नाही याच अधिवेशनात कायदा करावा. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...