spot_img
अहमदनगरAhmednagar: गारपीटग्रस्त शेतकरी आक्रमक! 'यांच्या' नेतृत्वाखाली रस्ता रोको, 'पंधरा दिवस उलटले....'

Ahmednagar: गारपीटग्रस्त शेतकरी आक्रमक! ‘यांच्या’ नेतृत्वाखाली रस्ता रोको, ‘पंधरा दिवस उलटले….’

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री-
पंधरा दिवस उलटूनही सांगवी सूर्या, वडुले, पानोली गावातील गारपीटग्रस्तांना शासकीय मदत मिळाली नाही. तसेच कांद्यासह दूध व शेतमालाचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकर्‍यांनी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली पानोली येथे मंगळवारी (दि. १२) सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन केले.

तालुकाप्रमुख पठारे व माजी सभापती सोन्या बापू भापकर यांच्यासह शेतकर्‍यांच्या वतीने मंडळ अधिकारी सचिन पोटे यांना निवेदन दिले.यावेळी सामजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड, माजी सरपंच संदीप गाडेकर, संजय भगत, रामा गाडेकर, खोडदे, भागाशेठ गायकवाड, राजू शिरसगर, शरद गायकवाड, मोहित जाधव यांच्या शेतकरी उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनात निघोज, जवळा, गुणोरे, गाडीलगाव, राळेगण, पठारवाडी, सांगवी, पानोली, वडुले, पिंपळनेर, गांजीभोयरे, गाडीलगाव, म्हसे, कोहकडी येथील गारपीटग्रस्त शेतकरी, दूध उत्पादक सहभागी झाले.

निवेदनात म्हटले, की सांगवी सूर्या येथे विठ्ठल मंदिरात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे ९ डिसेंबरपासन जनावरांसह शासकीय मदतीच्या मागणीसाठी साखळी उपोषण चालू आहे. मंगळवारी उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप शासनाकडून दखल घेण्यात आली नाही.

त्याचप्रमाणे केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी घालणे, उसापासून इथेनॉल निर्मितीला बंदी घालणे, दुधाचे दर पाडणे असे शेतकरी विरोधी निर्णय घेतले आहेत.

त्यामुळे या निर्णयांचा निषेध म्हणून शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. शासनाने शेतकर्‍यांच्या व गारपीटग्रस्तांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...