spot_img
अहमदनगरAhmednagar politics: दहा वर्ष रखडलेलं 'ते' काम दोन वर्षात पूर्ण; खासदार विखे...

Ahmednagar politics: दहा वर्ष रखडलेलं ‘ते’ काम दोन वर्षात पूर्ण; खासदार विखे पाटील

spot_img

थिटे सांगवी । नगर सहयाद्री –
नगर करमाळा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली दहा वर्ष रखडलेले होते. मी खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण केले असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

ते थिटे सांगवी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी प्रताप भैय्या पाचपुते, सिद्धेश्वर देशमुख, शरद बोटे, डॉ. दिलीप बोस, अर्जुन देवा शेळके, बलभीम आप्पा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार विखे म्हणाले, आमदार बबनदादा पाचपुते व माझ्या माध्यमातून थिटे सांगवी या गावात दोन ते अडीच कोटी रुपये मंजूर करून आज या गावामध्ये मी आलो आहे. यापुढेही असेच विकासासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी खासदार विखे यांनी दिली.

तसेच त्याच बजेट पेठ मधून श्रीगोंदा मतदारसंघासाठी आमदार बबनदादा पाचपुते यांनी २०० कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर केले असून ज्येष्ठ आमदार म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत असे मत मांडून खासदारकीच्या माध्यमातून काम करत आज विकासाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाट्न

येणाऱ्या नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यात देशाचे नेते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे नगर बायपास व नगर करमाळा राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...