spot_img
ब्रेकिंगजपानी महिलेच्या पर्सवर डल्ला! सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..

जपानी महिलेच्या पर्सवर डल्ला! सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..

spot_img

शिर्डी। नगर सह्याद्री

अहमदनगर जिल्ह्यातील श्री. साईबाबांच्या समाधी असलेल्या शिर्डी नगरीत जपानी महिलेच्या पर्सवर डल्ला मारत एक लाख पंचवीस हजार रुपये चोरी गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जपानी महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्या गुन्हा दाखल केला आहे.

जपान येथील साईभक्त महिला श्री.साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र शिर्डी येथे आली होती. दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात खरेदी करत असताना या महिलेच्या सव्वा लाखाचा ऐवज असलेल्या पर्सवर चोरट्यांनी डल्लामारला आहे.

जपानी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे साई भक्तांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शिर्डीतील स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याने साईबाबा मंदिर सुरक्षा व्यवस्थेला धारेवर धरले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एक कोटींची खंडणी अन् जीवे मारण्याची धमकी; कुठे घडला प्रकार पहा

बीड / नगर सह्याद्री : बीडमध्ये ढाकणे कुटुंबातील पिता पुत्रावर झालेल्या मारहाणप्रकरणी सतीश भोसलेवर...

उद्धवजी, तुमच्या हिंदुत्वाला उपनेत्यानेच छेद दिलाय!

संजय राऊतांचा पठ्ठ्या शिवसेना उपनेता साजन पाचपुते निघाला गोवंशाची कत्तल करणाऱ्या गँगचा म्होरक्या! सारिपाट /...

‘स्थानिक स्वराज्य संस्था मविआच्या ताब्यात येणार’

पारनेर | नगर सह्याद्री:- आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता...

भारत पुन्हा चॅम्पियन; 12 वर्षांनंतर रचला इतिहास!

नवी दिल्ली | वृत्तसंस्था चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत...