spot_img
अहमदनगरआमदार संग्राम जगताप आक्रमक, म्हणाले त्या घटना दुर्दैवीच; पोलिसांनी केले असे...

आमदार संग्राम जगताप आक्रमक, म्हणाले त्या घटना दुर्दैवीच; पोलिसांनी केले असे…

spot_img

पोलिसांनी साधला आमदार आणि व्यापार्‍यांशी संवाद
अहमदनगर | नगर सह्याद्री – 
MLA Sangram Jagtap : शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाले आहेत. पोलीस तपास वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला आमदार संग्राम जगताप [MLA Sangram Jagtap] यांनी निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी लेखी निवेदन दिले. आडते बाजार दाळ मंडई येथील व्यापार्‍यांची बैठक घेऊन संवाद साधत तातडीने प्रश्न मार्गी लावा असे आमदार संग्राम जगताप [MLA Sangram Jagtap] यांनी सांगितले. चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्यास दुर्दैवी अनुचित घटना घडू शकते. चोरीची घटना घडल्यावर आरोपींना तातडीने जेरबंद केल्यानंतर त्याच्यावर पोलिसांचा वचक राहील व अशा चोरीच्या घटना वारंवार होणार नाही. व्यापार्‍यांच्या तक्रारी पोलिसांनी गांभीर्याने घ्याव्या, शहरातील चितळे रोड, मंगलगेट, सराफ बाजार येथील पोलीस चौकी तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, व्यापारी संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, सतीश मैड, कमलेश भंडारी, गोपाळ मणियार,अजिंय बोरकर, विश्वनाथ कासट, शांतीलाल गांधी, सुशील भळगट, हिरालाल चोपडा, अजित भंडारी,सतीश गुंदेचा, शैलेश गांधी, आदी उपस्थित होते.अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे म्हणाले की, पोलीस प्रशासन चोरीच्या व दरोड्याच्या सर्व घटनांचा तपास गांभीर्याने लावत आहे. नगर जिल्हा हा विस्ताराने मोठा असून पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे ५५० पोलीस भरतीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. व्यापार्‍यांचे प्रश्न सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. व्यापार्‍यांनी केवळ आपल्या दुकानांपुरते सीसीटीव्ही न लावता दुकानाबाहेर देखील लावावेत.

शहरातील दाळ मंडई, कापड बाजार आडते बाजार, सराफ बाजार यांना सुरक्षित ठेवणे आमचे कर्तव्य आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, आ. संग्राम जगताप [MLA Sangram Jagtap] यांनी चोरीच्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाची भेट घेत निवेदन देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शहरात कारवाई सुरु आहे. विना नंबरच्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. टवाळखोरांचा शोध घेण्यात येत असून नियम मोडणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. व्यापार्‍यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

यावेळी तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी देखील व्यापार्‍यांशी संवाद साधला. यावेळी पोलीस प्रशासनाकडून आ. संग्राम जगताप यांना मुख्य बाजारपेठेत होत असलेल्या चोरीच्या तपासा बाबत उपोषण स्थगित करण्याचे लेखी पत्र देण्यात आले. प्रभारी अधिकारी यांना गुन्ह्याची उकल करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना दिलेल्या आहेत.त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीत अचानक नाकाबंदी लावून विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच क्षमतेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणार्‍या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली, असून सदर पथकामार्फत सदर गुन्ह्याचा सखोल तपास चालू आहे.

बीट मार्शल सुरु करावे
पूर्वी नगर शहरात बीट मार्शल सुरु होते, आता ते सुरु नाही तरी पुन्हा बीट मार्शल सुरु करावे. जेणेकरून पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतील. जर पोलिसांकडे दुचाकी उपलब्ध नसेल तर लोकसहभागातून दुचाकी गाड्या उपलब्ध करून यासाठी कुठल्या कंपनीच्या गाड्या हव्यात त्याचा सविस्तर प्रस्ताव द्यावा. जेणेकरून नगरच्या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होईल असे मत आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...