spot_img
लाईफस्टाईलअब्जाधीश जेआरडी टाटांना एकेकाळी थंडीपासून वाचण्यासाठी शर्टाच्या आत कोंबावे लागले होते ...

अब्जाधीश जेआरडी टाटांना एकेकाळी थंडीपासून वाचण्यासाठी शर्टाच्या आत कोंबावे लागले होते वर्तमानपत्रांच्या घडया, जाणून घ्या कहाणी

spot_img

नगर सह्याद्री टीम : जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजेच जेआरडी टाटा यांचे नाव ऐकताच समोर उभा राहतो अत्यंत मोठा बिझनेसमन. समोर एका व्यावसायिक पायलटचे चित्र तयार होते, कारण त्यांच्याशी एअर इंडिया निर्माण करण्याच्या अनेक कहाण्या जोडल्या जातात.

आज व्यवसायामध्ये तसेच संपत्तीच्या बाबतीत त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. अशा या मोठ्या बिझनेसमनला आणि एका मोठ्या समूहाच्या प्रमुखाला अर्थात जेआरडी टाटा यांना एकेकाळी अशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता की स्वतःचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करावा लागला होता. या घटनेचा उल्लेख त्यांच्या बियॉन्ड द लास्ट ब्लू माउंटन या पुस्तकात आहे.

ते सांगतात की ते हनिमूनसाठी कंचनजंगा पर्वतरांगा बघायला गेला होते, डिसेंबरची हिवाळ्याची वेळ होती, एके दिवशी ते दार्जिलिंगच्या टायगर हिलवर सूर्योदय पाहायला गेले होते, डोंगरावरून उगवणारा सूर्य पाहून त्याने ट्रेकिंगला सुरुवात करण्याचं ठरवलं पण जेआरडी हे विसरले की ते ज्या टेकड्या सर करणार आहेत ते माऊंट एव्हरेस्ट आहे.

त्या पुस्तकानुसार, जेआरडी त्यांच्या पत्नीसह घोड्यावर बसून टोंगल संदाकुफच्या दोन दिवसांच्या प्रवासाला निघाले. 12 हजार फुट वर पोहोचल्यावर त्यांना मनोहर सुंदर दृश्य दिसू लागली. पण प्रचंड थंडीही जाणवू लागली.

हिवाळा इतका तीव्र होता की त्यांना त्या थोड्या कपड्यानिशी तेथे थांबवणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी थंडीपासून वाचण्यासाठी अन स्वतःला उबदार ठेवण्यासाठी रात्रभर तेथे आगीमध्ये लाकडे पेटवत राहिले. आणि कपड्यांमध्ये वर्तमानपत्रांच्या घड्या करून ते आतून घातले. देशाला पहिली एयरलाइंस देणारे जेआरडी टाटा हे पायलटचे प्रमाणपत्र मिळवणारे पहिले भारतीय होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...